धक्कादायक : बुलडाण्यात बलात्कारानंतर मुलीचा चेहरा केला विद्रूप

बुलडाण्यात एका अल्पवयीन मुलीवर बलात्काराची घटना घडलीय. धक्कादायक म्हणजे, बलात्काऱ्यांची क्रूरता इथेच थांबली नाही तर त्यांनी या मुलीचा चेहरा विद्रूप करण्याचाही प्रयत्न केला.

Updated: Apr 1, 2015, 01:09 PM IST
धक्कादायक : बुलडाण्यात बलात्कारानंतर मुलीचा चेहरा केला विद्रूप title=

बुलडाणा : बुलडाण्यात एका अल्पवयीन मुलीवर बलात्काराची घटना घडलीय. धक्कादायक म्हणजे, बलात्काऱ्यांची क्रूरता इथेच थांबली नाही तर त्यांनी या मुलीचा चेहरा विद्रूप करण्याचाही प्रयत्न केला.

डोणगाव पोलीस स्टेशनमध्ये या घटनेची तक्रार नोंदवण्यात आलीय. पीडित मुलगी अवघ्या १७ वर्षांची आहे... बलात्कारानंतर आरोपींनी पीडित मुलीचा चेहराही विद्रुप केला.. तिचे केसही कापले...

पोलिसांनी गुन्हा दाखल केला असू अधिक तपास सुरू असल्याचं पोलीस सांगतायत. 

मात्र ही विकृत मानसिकता आणि महिलांवरील अत्याचार थांबणार कधी असा सवाल उपस्थित करण्यात येतोय.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.