दिवाळीमध्ये फटाके उडवणे चिमुरडीच्या जीवावर बेतलं

दिवाळीमध्ये फटाके उडवणे एका चिमुरडीच्या जीवावर बेतलंय. नवी मुंबईत ही घटना घडलीये. फटाके फोडताना अंकीता किकाराम चौधरी या 8 वर्षीय मुलीच्या कपड्यांनी पेट घेतला.  गंभीररीत्या भाजून अंकीताचा दुर्दैवी अंत झाल्याची घटना कळंबोली सेक्टर-16 मध्ये घडली. 

Updated: Nov 3, 2016, 05:46 PM IST
दिवाळीमध्ये फटाके उडवणे चिमुरडीच्या जीवावर बेतलं title=

नवी मुंबई : दिवाळीमध्ये फटाके उडवणे एका चिमुरडीच्या जीवावर बेतलंय. नवी मुंबईत ही घटना घडलीये. फटाके फोडताना अंकीता किकाराम चौधरी या 8 वर्षीय मुलीच्या कपड्यांनी पेट घेतला.  गंभीररीत्या भाजून अंकीताचा दुर्दैवी अंत झाल्याची घटना कळंबोली सेक्टर-16 मध्ये घडली. 

पेटत्या फुलबाजीमुळे अंकीताच्या कपड्यांनी पेट घेतला. त्यामुळे ती गंभीररित्या भाजली होती. ऐरोलीतल्या बर्न हॉस्पिटलमध्ये तिच्यावर उपचार सुरू होते. पण अखेर तिचा मृत्यू झाला. 

दरम्यान, दिवाळीनिमित्त फटाके उडवताना गेल्या तीन दिवसामध्ये नवी मुंबईतील विविध ठिकाणी 26 जण भाजले आहेत. विशेष म्हणजे, या घटनेतील बहुतेक जण फटाके उडवताना, पेटत्या पणतीमुळे पेट घेतल्यामुळे भाजले गेलेत. 

यात 20 लहाने मुले आणि 6 मोठ्या व्यक्तींचा समावेश आहे.  सर्वांवर ऐरोलीतल्या बर्न हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे.