पुण्यात एकतर्फी प्रेमातून तरुणीवर जीवघेणा हल्ला

कोथरुड भागात एकतर्फी प्रेमातून एका तरुणीवर जीवघेणा हल्ला करण्यात आलाय. याप्रकरणी स्वप्नील कुंभार या तरुणाला अटक करण्यात आली.

Updated: Jun 17, 2015, 01:15 PM IST
पुण्यात एकतर्फी प्रेमातून तरुणीवर जीवघेणा हल्ला  title=

पुणे : कोथरुड भागात एकतर्फी प्रेमातून एका तरुणीवर जीवघेणा हल्ला करण्यात आलाय. याप्रकरणी स्वप्नील कुंभार या तरुणाला अटक करण्यात आली.

पुण्यातील कोथरुड भागात आपल्या मैत्रिंणीसोबत राहणाऱ्या एका मुलीवर स्वप्नील कुंभार या तरुणाने एकतर्फी प्रेमातून जीवघेणा हल्ला केला. ही मुलगी एमएसस्सी करत होती. तिची मुलाखत असल्यामुळे ती रात्री उशीरापर्यंत रूमवरच त्याची तयारी करत होती. 

दरम्यान आरोपी स्वप्नील हा तिच्या रूममेटचा चुलत भाऊ गेल्या दोन वर्षांपासून तिच्या मागे लागला होता. परवा रात्री उशिरा स्वप्नीलने त्या मुलीला रुमखाली बोलावून तिच्यावर चाकुने तब्बल २१ वार केले. त्यामुळे ही मुलगी गंभीररित्या जखमी झाली. जखमी मुलीला तिच्या मैत्रिणींनी सह्याद्री हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.