गोवा बनावट दारूसह 13 लाखांचा मुद्देमाल जप्त

राज्य उत्पादन शुल्क विभागानं गोवा बनावटीची दारू जप्त केलीय. नाताळ आणि नववर्षाच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आलीय. तब्बल 13 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तर तीन आरोपींनाही अटक करण्यात आली.

Updated: Dec 10, 2016, 11:02 PM IST
गोवा बनावट दारूसह 13 लाखांचा मुद्देमाल जप्त  title=

रत्नागिरी : राज्य उत्पादन शुल्क विभागानं गोवा बनावटीची दारू जप्त केलीय. नाताळ आणि नववर्षाच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आलीय. तब्बल 13 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तर तीन आरोपींनाही अटक करण्यात आली.

राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे की कारवाई करण्यात आलीय. साडसात लाखांची दारू आणि एक एर्टिगा गाडी जप्त केलीय. पहिली धाड मौजे रेहेळवैजी गावात टाकली. गाडीमध्ये दारू भरतावा ही धाड टाकली. त्यांची चौकशी केली त्यावेळी त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे दुसरी धाड टाकली. 

सावर्डे गावात ही धाड टाकली. चहाच्या टपरीमागे झोपडीत काही बॉक्स जप्त केले. या कारवाई उमेश आयरे, दिनेश कदम, संतोष कातकर या तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे.