त्या युवकाचा मृतदेह नग्नावस्थेत आढळला

जिल्ह्यातील गोरेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या नागझिरा जंगल परिसरातील झाडाला लटकलेला नग्न अवस्थेत एका २१ वर्षीय मुलाचा मृतदेह आढळला आहे. मृतदेहाजवळ लिंबू , कुंकू असे साहित्य देखील आढळले आहे. त्यामुळे हा नरबळीचा प्रकार तर नाही ना अशी शंका व्यक्त केली जात आहे. 

Updated: Dec 2, 2016, 07:58 PM IST
त्या युवकाचा मृतदेह नग्नावस्थेत आढळला title=

गोंदिया : जिल्ह्यातील गोरेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या नागझिरा जंगल परिसरातील झाडाला लटकलेला नग्न अवस्थेत एका २१ वर्षीय मुलाचा मृतदेह आढळला आहे. मृतदेहाजवळ लिंबू , कुंकू असे साहित्य देखील आढळले आहे. त्यामुळे हा नरबळीचा प्रकार तर नाही ना अशी शंका व्यक्त केली जात आहे. 

मृत मुलाचे नाव महेंद्र मेश्राम असून तो गोरेगाव तालुक्यातील हिरापूर या गावत राहत होता मात्र तो गेल्या २२ तारखेपासून बेपत्ता होता. मात्र कुटुंबीयांनी शोधाशोध घेतल्यानंतर सुद्धा त्याचा पत्ता न लागल्यामुळे अखेर त्याची बेपत्ता असल्याची तक्रार २५ नोहेंबरला गोरेगाव पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आली होती. 

मात्र आज त्याचा नग्न अवस्थेत असलेला मृतदेह जंगलात झाडाला टांगलेल्या अवस्थेत मिळाला. या प्रकरणी अकस्मात मृत्यूचा गुन्हा पोलिसांनी दाखल केला असून अधिक तपस सुरु आहे.