नाशिक : आडत बंदीच्या निर्णयाला सरकारने स्थगिती दिली असल्याची माहिती सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. आडतबंदीच्या विरोधात व्यापाऱ्यांनी संपाचं हत्यार उगारलं आणि सरकार बॅकफूटवर जाऊन बसलंय.
शेती मालाची विक्री होत असतांना आडत ही शेतकऱ्यांकडून न घेता व्यापाऱ्यांनी त्याची जबाबदारी घ्यावी, असा निर्णय पणन संचालक सुभाष माने यांनी घेतला होता. मात्र या विरोधात व्यापाऱ्यांनी संपाचं हत्यार उपसल्याने हा निर्णय सरकारने मागे घेतला आहे.
१५ दिवसांत सर्व घटकांशी चर्चा करून लवकरच तोडगा काढणार असल्याचं, सहकार मंत्र्यांनी यावेळी सांगितलं.
दरम्यान आडत बंदीच्या निर्णयानंतर नाशिक बाजार समितीत शेतीमालाची विक्री न होऊ शकल्याने शेतकऱ्यांना फटका बसण्याची शक्यता आहे.
शेतकऱ्यांकडून अजूनही आडत आणि हमाली घेतली जाते, हे पैसे शेतकऱ्याला देण्यात येणाऱ्या शेतीमालाच्या पैशातून वजा केले जातात.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.