अपंग भिकाऱ्याला पोलिसाची अमानुष मारहाण

मनमाड रेल्वे स्थानक बुकिंग ऑफिस परिसरात झोपलेल्या एका अपंग भिकाऱ्याला मनमाड लोहमार्ग पोलिसांनी लाठ्याकाठ्यांनी अमानुषपणे बेदम मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

Updated: Jan 12, 2017, 10:04 PM IST
अपंग भिकाऱ्याला पोलिसाची अमानुष मारहाण  title=

मनमाड : मनमाड रेल्वे स्थानक बुकिंग ऑफिस परिसरात झोपलेल्या एका अपंग भिकाऱ्याला मनमाड लोहमार्ग पोलिसांनी लाठ्याकाठ्यांनी अमानुषपणे बेदम मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

जयकुमार तायडे असे मारहाण करणाऱ्या पोलिसांचे नाव आहे. रेल्वे परिसरात रात्रीच्या वेळी काही भिकारी रेल्वे बुकिंग ऑफिस परिसरात झोपले होते. त्यांना हाकलण्याचे काम तायडे करी असतांना एका मद्यपी भिकाऱ्याने त्यांना शिवी दिली. त्यामुळे संतापलेल्या तायडे यांनी भिकाऱ्याला काठी व लाठ्या - बुक्यांनी अमानुष मारहाण केली. संतापलेल्या तायडे यांनी काही प्रवाश्यांनाही मारहाण केली. याप्रकरणी पोलीस आणखी तपास करीत आहे.