नाशिक : जिल्ह्यात गेल्या पाच दिवसांमध्ये अवकाळी पावसामुळे तब्बल ३२४ गावांमधील शेतकरी बाधित झाले आहेत. जिल्ह्याभरात सुमारे साडेबावीस हजार हेक्टरवरील पिकांचे मोठे नुकसान या गारपिटीने तर वर्ष्भारात सुमारे सत्तर हजार हेक्टर नुकसान झाले आहे.
हा सर्व प्राथमिक अंदाज असला तरी जिल्हा प्रशासनाच्या पंचनाम्या नंतर अधिक होण्याची शक्यता आहे.
सोमवारी १७ गावांना तडाखा
सोमावरी अवकाळी पावसानं थैमान घातलं आणि इगतपुरी आणि सुरगाणा तालुक्यांतल्या १७ गावांना त्याचा तडाखा बसला.
मंगळवारी १६९० हेक्टर शेत उध्वस्त
मंगळवारी नाशिकसह पाच तालुक्यांमधल्या ४४ गावांना पावसानं दगा दिला. सर्वाधिक फटका सिन्नरसह, दिंडोरी, पेठ, निफाड, येवला आणि बागलाणमध्ये १६९० हेक्टर शेतीला बसला डाळिंब, द्राक्ष, गहू, मका, भाजीपाला आणि कांदा पूर्णपणे वाया गेला.
बुधवारी गारांचा हंगामा
बुधवारी नाशिक, दिंडोरी, पेठ, बागलाणसह कळवण तालुकाही गारपीटीच्या तडाख्यात आला. २२ गावांमध्ये किरकोळ नुकसान झालं.
शुक्रवारी अडीचशे गावांना तडाखा
शुक्रवारी झालेल्या वादळी गारर्पितीच्या तडाख्यात सर्वाधिक अडीचशे गावांमध्ये भीषण हाहाकार केला.
शनिवारी सगळं भुईसपाट
शनिवारी १०७ गावांमध्ये जोरदार गारपीट झाली. या दोन दिवसांत २२ हजार ६६८ हेक्टर शेती आणि त्यावरची उभी कापणीला आलेली पिकं भीषण गारांनी अक्षरक्ष नष्ट केली.
पाच दिवसांच्या या पावसाच्या थैमानानं कांदे, द्राक्षं, डाळिंबांचं अतोनात नुकसान झालंय. वर्षभरात अवकाळी पावसाच्या संकटानं सत्तर हजार हेक्टरवर नुकसान झालंय.
धनधान्यांनी सुजलाम सुफलाम अशी नाशिक जिल्ह्याची ओळख. पण गेलं वर्षभर गारपीटीनं नाशिकमध्ये जो हैदोस घातला, त्यामुळे नाशिकचा शेतकरी तब्बल तीन वर्षांनवी मागे फेकला गेलाय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.