बुलडाणा : राज्यात सलग दुस-या दिवशी अवकाळी पावसानं हजेरी लावलीय.. बुलडाण्यात वीज पडून एका शेतक-याचा मृत्यू झालाय.. तर दोन शेतमजूर गंभीर जखमी झालेत.
बुलडाण्यात सकाळपासून ढगाळ वातावरण होतं.. दुपारच्या सुमारास चिखली तालुक्यात वीजेचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस सुरु झाला..
अचानक आलेल्या पावसामुळं शेतात काम करणा-या मजुरांची धांदल उडाली.. त्याचवेळी झाडाच्या आडोशाला उभ्या असलेल्या एका शेतक-यांच्या अंगावर वीज कोसळली आणि जागीच मृत्यू झालाय. तर दोन शेतमजूर गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत..
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.