`हॉटेल बंद`मुळे बाहेर खाणाऱ्यांना उपवास!

मुंबई, पुणे आणि नाशिकमध्ये आज हॉटेल्स बंद होती. रोज बाहेर खाणा-यांची त्यामुळे चांगलीच पंचाईत झाली. केंद्र सरकारनं लावलेल्या 12.36 टक्के सेवाकराच्या विरोधात हॉटेल्स बंद ठेवण्यात आली होती.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Apr 29, 2013, 08:44 PM IST

www.24taas.com, मुंबई
मुंबई, पुणे आणि नाशिकमध्ये आज हॉटेल्स बंद होती. रोज बाहेर खाणा-यांची त्यामुळे चांगलीच पंचाईत झाली. केंद्र सरकारनं लावलेल्या 12.36 टक्के सेवाकराच्या विरोधात हॉटेल्स बंद ठेवण्यात आली होती.
हॉटेलमधल्या खाद्यपदार्थांवर याआधीच राज्य सरकारनं साडेबारा टक्के व्हॅट लागू केलाय. आता पुन्हा केंद्राच्या माध्यमातून सेवाकर लागू केला जाणार असल्यानं, खाद्य पदार्थांच्या किंमती वाढतील आणि हॉटेलिंग सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जाईल अशी भीती हॉटेल व्यावसायिकांना आहे.

देशातल्या इतर राज्यांप्रमाणे हॉटेल्सना पर्यटन व्यवसायाचा दर्जा देऊन करांमध्ये सवलत देण्याची मागणी हॉटेल व्यावसायिकांनी केलीय.