पिंपरी चिंचवड : पिंपळे सौदागर परिसरातलं हॉटेल गोविंद गार्डन…! हे हॉटेल सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. या हॉटेलमध्ये पक्ष्यांना पाणी आणि चारा मिळावा यासाठी उपाययोजना करण्यात आल्या आहेत. मोठा परिसर आणि असंख्य झाडं यामूळ गोविंद गार्डन हॉटेलमध्ये नेहमी पक्षी येतात. आता उन्हाळ्यात पक्ष्यांना पाणी आणि चाऱ्याची गरज लक्षात घेऊन हॉटेलमध्ये पक्ष्यांसाठी घरटी बसवण्यात आली आहेत. पक्ष्यांना पाणी मिळावं यासाठीही येथे व्यवस्था करण्यात आली आहे.
पिंपरी-चिंचवडमध्ये उष्णतेमुळ प्राण्यांच्या जखमी होण्याच्या संखेत जवळपास ४ पटीनं वाढ झाली आहे. राज्यातल्या सर्वच शहरात कमी अधिक प्रमाणात हीच स्थिती आहे. त्यामुळे या मुक्या पक्ष्यांना वाचवण्यासाठी सगळ्यांनीच आपापल्या परीनं पुढाकार घेण्याची गरज आहे.