मुलीच्या नाकाची सर्जरीच्या दोन महिन्यानंतर निघाला संजय दत्त बाहेर

 अभिनेता संजय दत्तला ३० दिवसांचा पेरोल देण्याच्या प्रकरणात जेल प्रशासनाचा बेजबाबदारपणा समोर आला आहे. प्रकरण इतकं गंभीर आहे कायद्याचा जाणकारांनी जेल प्रशासनाच्या अधिकाऱ्यांवर डोकं न चालविण्याचा आरोप केला आहे. 

Updated: Sep 2, 2015, 09:29 PM IST
मुलीच्या नाकाची सर्जरीच्या दोन महिन्यानंतर निघाला संजय दत्त बाहेर  title=

मुंबई :  अभिनेता संजय दत्तला ३० दिवसांचा पेरोल देण्याच्या प्रकरणात जेल प्रशासनाचा बेजबाबदारपणा समोर आला आहे. प्रकरण इतकं गंभीर आहे कायद्याचा जाणकारांनी जेल प्रशासनाच्या अधिकाऱ्यांवर डोकं न चालविण्याचा आरोप केला आहे. 

द टाइम्स ऑफ इंडिया या वृत्तपत्राने दिलेल्या बातमीनुसार गेल्या आठवड्यात अभिनेता संजय दत्तला त्याचा मुलीच्या नाकाच्या सर्जरीसाठी एक महिन्याची पेरोल दिली आहे. पण तिची सर्जरी दोन महिन्यांपूर्वीच झाली असल्याचा दावा या बातमीत करण्यात आला आहे. 

अधिक वाचा : संजय दत्त पुन्हा जेल बाहेर येणार

संजय दत्तने मुलीच्या नाकाच्या सर्जरीसाठी सुट्टी मिळण्यासाठी २६ मार्च रोजी अर्ज केला होता. यात मुलीवर एप्रिल महिन्यात सर्जरी होणार असल्याचे म्हटले होते. पण येरवडा जेल प्रशासनाने संजय दत्तला २६ ऑगस्ट रोजी पेरोल देण्यात आली. 

येरवडा जेलच्या पेरोल प्रकरणाशी संबंधीत वकील फरहाना शाह यांनी सांगितले की, जेल मॅन्युअलवर पेरोल अर्जावर ४५ दिवसांच्या आत निर्णय घ्यायचा असतो. पण संजय दत्तच्या या प्रकरणात याकडे दुर्लक्ष करण्यात आले. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.