मला मुंडे साहेबांचे अधुरे राहिलेले स्वप्न पूर्ण करायचेय - पंकजा

गोपीनाथ मुंडे यांचे अधुरे राहिलेले स्वप्न पूर्ण करायचेय त्यासाठी तुमच्या आशीर्वादाची गरज आहे. तुम्ही ते मोठ्या मनाने मला द्याल. बीड जिल्ह्याच्या विकासासाठी मला काम करायचे आहे. तुम्ही माझ्या पाठिशी राहा. मी विकास काय असतो ते दाखवून देईन, असे प्रतिपादन भाजपचे बीड मतदार संघातील उमेदवार पंकजा पालवे-मुंडे यांनी केले.

Updated: Oct 4, 2014, 11:58 PM IST
मला मुंडे साहेबांचे अधुरे राहिलेले स्वप्न पूर्ण करायचेय - पंकजा title=

बीड : गोपीनाथ मुंडे यांचे अधुरे राहिलेले स्वप्न पूर्ण करायचेय त्यासाठी तुमच्या आशीर्वादाची गरज आहे. तुम्ही ते मोठ्या मनाने मला द्याल. बीड जिल्ह्याच्या विकासासाठी मला काम करायचे आहे. तुम्ही माझ्या पाठिशी राहा. मी विकास काय असतो ते दाखवून देईन, असे प्रतिपादन भाजपचे बीड मतदार संघातील उमेदवार पंकजा पालवे-मुंडे यांनी केले.

बीड येथे जाहीर सभा झाली. त्यावेळी त्या बोलत होत्या. आज येथे लाखोंच्या संख्येने जमले आहात. ते मुंडेसाहेबांच्या प्रेमाखातर. त्यांचे प्रेम तुमच्यावर होते. विरोधी पक्षात असूनही विकास केला. आज रेल्वेचे अधुरे राहिलेले स्वप्न मी पूर्ण  करणार आहे. जिल्ह्यात भाजपचे सहा उमेदवार आहेत. त्यांना निवडून द्या आणि गोपीनाथ मुंडे यांना खरी श्रद्धांजली वाहा, असे भावनिक आवाहन पंकजा यांनी यावेळी केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंडेसाहेबांना महत्वाचे खाते देऊन मोठा सन्मान केला. मात्र, नियतिच्या मनात वेगळे होते. नियतिने आपल्या नशिबातील नेले. आता आपण तुमच्या आशीर्वादाने पुन्हा विकासाचे स्वप्न पूर्ण करुया. आज मोदी यांनी बीड येथे येऊन प्रचाराला सुरुवात केली आहे. हा साहेबांना दिलेला मोठा सन्मान आहे. त्यांचे माझ्या आणि बीडवासियांतर्फे आभार. येथे जमलेली गर्दी ही मुंडे साहेबांच्या कामाची पोचपावती देते. तुम्ही असं कोणतेही पाऊल उचलू नका की मुंडे आणि माझी मान खाली जाऊ नये, असे आवाहन पंकजा यांनी केले.

गोपीनाथ मुंडे गेले तेव्हा मोदींनी डोक्यावर ठेवलेल्या हातामुळे माझं दु:ख नाहीसं झालं. गोपीनाथ मुंडे यांचं स्वप्न साकार करणार आहे.  जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. तुमचं मत हे मुंडे साहेबांना आदरांजली असेल असे पकंजा यांनी यावेळी सांगितले.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.