मी निष्कलंक आहे, आरोप सिद्ध झाले तर राजकारण सोडेन : पंकजा

महिला व बालविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी खास ब्लॉग लिहून आपल्यावरील सर्व आरोपांना उत्तर दिलंय. महिला व बालविकास खात्याची २०६ कोटी रूपयांची साहित्य खरेदी वादात अडकल्यानंतर पंकजा मुंडे यांनी हा ब्लॉग फेसबुकवर लिहिलाय.

Updated: Jun 26, 2015, 08:35 PM IST
मी निष्कलंक आहे, आरोप सिद्ध झाले तर राजकारण सोडेन : पंकजा   title=

बीड : महिला व बालविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी खास ब्लॉग लिहून आपल्यावरील सर्व आरोपांना उत्तर दिलंय. महिला व बालविकास खात्याची २०६ कोटी रूपयांची साहित्य खरेदी वादात अडकल्यानंतर पंकजा मुंडे यांनी हा ब्लॉग फेसबुकवर लिहिलाय.

निष्कलंक आहे. जर एक रूपयाची जर मिंधी असेल तर मंत्रालयच काय, राजकारणातून कायमची बाहेर जाईन. शब्दांत त्यांनी विरोधकांना आव्हान दिलंय

पंकजा यांनी ब्लॉगमध्ये काय म्हटलंय?  
कालपर्यंत माझं नांव गुगल केलं तर ' मी रडणार नाही, लढणार आहे ' असं सांगणारी बातमी यायची.आता देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमधील एक पहिला स्कॅम म्हणून बातमी येते. अर्थात मी अजूनही रडणार नाही, लढणारच आहे पण कोणासाठी ? ज्या जनतेसाठी मी लढणार आहे, ती जनता यात काय करू शकते? हा माझा सवाल आहे.जे माझ्यावर प्रेम करतात ते व्यथित होऊन बघतील व ज्यांना मला पराभूत करता आलं नाही ते मला परेशान केलं म्हणून स्वतःची पाठ थोपटून घेतील आणि स्वतःला मर्द म्हणूनही घेतील.

 

कालपर्यंत माझं नांव गुगल केलं तर ' मी रडणार नाही, लढणार आहे ' असं सांगणारी बातमी यायची.आता देवेंद्र फडणवीस यांच्या सरकार...

Posted by Pankaja Gopinath Munde on Friday, 26 June 2015

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.