डॉक्टर पत्नीला इंजीनिअरने चिमुकल्यासमोर गोळ्या घातल्या

वाकडमध्ये अभियंत्याने केला डॉक्टर पत्नीचा खून केल्याचं सांगण्यात येत आहे. घरगुती भांडण, पैशाचा वाद आणि चारित्र्याच्या संशय हे हत्येमागील कारण असल्याचं सांगण्यात येत आहे. 

Updated: Jul 14, 2016, 06:07 PM IST
डॉक्टर पत्नीला इंजीनिअरने चिमुकल्यासमोर गोळ्या घातल्या

पुणे : वाकडमध्ये अभियंत्याने केला डॉक्टर पत्नीचा खून केल्याचं सांगण्यात येत आहे. घरगुती भांडण, पैशाचा वाद आणि चारित्र्याच्या संशय हे हत्येमागील कारण असल्याचं सांगण्यात येत आहे. 

पोलिस उपनिरीक्षक राजकुमार केंद्रे यांनी आरोपीचा मोबाईलवरून आणि गाडीनंबरचा शोध लावून अवघ्या ४ तासात  त्याला जेरबंद केलं.

आपली आई डॉ. अंजली यांना क्लिनिकमध्ये गोळ्या घातल्या ते दृश्य दोन वर्षाचा चिमुकला प्रयाग याने पाहिल्याचं सांगितलं जात आहे. आपल्यासमोर आई रक्ताच्या थारोळ्यात पडली हे पाहून या चिमुकल्याने हंबरडा फोडला, आक्रोश केला.

कम्प्युटर इंजीनिअरने डॉक्टर पत्नीचा गोळ्या घालून खून केला. वाकड येथे रात्री दहाच्या सुमारास ही घटना घडली. 

मनोजची पत्नी ३० वर्षांची होती, डॉ. अंजली मनोज पाटीदार असं हा महिला डॉक्टरचं नाव आहे, अंजलीच्या भावाने  लोहगाव पोलिसात तक्रार दाखल केली आहे. 

मनोज पाटीदार हा कम्प्युटर इंजीनिअर  हिंजवडीच्या टीसीएस कंपनीमध्ये नोकरीस आहे. अंजली ही त्याची तिसरी बायको होती. मनोजने २०११ साली मुंबई येथे एका तरूणीशी विवाह केल्याची माहितीही पोलिसांना मिळाली आहे.

पत्नीचाही संशयास्पद मृत्यू झाल्याचे समजते. तर त्यानंतर कोंढवा येथे आठव्या मजल्यावरून पडून त्याच्या दुसऱ्या पत्नीचा संशयास्पद मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.