रत्नागिरीत शहर बसने उडविल्याने कबड्डीपटू तरुणीचा मृत्यू

येथे कबड्डी स्पर्धेसाठी आलेल्या अमरावती विद्यापीठाच्या संघातल्या दोन मुलींना शहर बसने उडविल्याने एका मुलीचा मृत्यू झालाय. तर दुसरी मुलगी गंभीर जखमी झालीय. या दोन्ही मुली रस्ता ओलांडत असताना हा अपघात झाला.

Updated: Dec 8, 2015, 08:44 AM IST
रत्नागिरीत शहर बसने उडविल्याने कबड्डीपटू तरुणीचा मृत्यू

रत्नागिरी : येथे कबड्डी स्पर्धेसाठी आलेल्या अमरावती विद्यापीठाच्या संघातल्या दोन मुलींना शहर बसने उडविल्याने एका मुलीचा मृत्यू झालाय. तर दुसरी मुलगी गंभीर जखमी झालीय. या दोन्ही मुली रस्ता ओलांडत असताना हा अपघात झाला.

रत्नागिरी जेलरोड इथे सिग्नलजवळ हा अपघात झाला. नागरिकांनी मुलींना सिव्हील रूग्णालयात दाखल केलंय. पूजा विलासराव आगरकर असं मृत मुलीचं नाव आहे. पूजा मूळची यवतमाळची आहे. तर गंभीर जखमी झालेली प्रियंका काळे ही मुलगी बुलडाण्याची आहे. 

रत्नागिरीतल्या गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात पश्चिम विभागीय महिला कब्बडी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेय. त्यासाठी राज्यातील विविध विभागातून महिला खेळाडू इथं दाखल झाल्यात. पूजा आणि प्रियंका या रात्री मेसमध्ये जेवण करुन परतत असताना रस्ता ओलांडताना शहर बसने त्यांना जोरदार धडक दिली. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x