`कानडी` दडपशाही... कार्यकर्त्यांची धरपकड

बेळगावमध्ये कानडी दडपशाहीनं कळस गाठलयं. मराठी भाषकांचा विरोध डावलून बेळगावमध्ये कर्नाटक सरकारच्या विधानभवनाचं उद्घाटन होतयं.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Oct 11, 2012, 09:30 AM IST

www.24taas.com, बेळगाव, कोल्हापूर
बेळगावमध्ये कानडी दडपशाहीनं कळस गाठलयं. मराठी भाषकांचा विरोध डावलून बेळगावमध्ये कर्नाटक सरकारच्या विधानभवनाचं उद्घाटन होतयं.
उदघाटनासाठी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी दुपारी बारा वाजता बेळगावात दाखल होणार आहेत. साडेबारावाजता त्यांच्या हस्ते उद्घाटन पार पडणार आहे. बेळगावातल्या मराठी भाषकांनी विरोध करण्यासाठी कडकडीत बंद पाळलाय. बेळगावातल्या मराठीबहुल शहापूर, भांदूरगल्ली, तासिलदारगल्ली आणि शास्त्रीनगरात कडकडीत बंद आहे. तर महाराष्ट्र एकिकरण समितीच्या महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी मारुती मंदिरात मूक धरणं आंदोलन धरलय. हे आंदोलन दडपण्यासाठी रात्रीपासूनच कर्नाटक पोलिसांनी महाराष्ट्र एकिकरण समितीच्या कार्यकर्त्यांची धरपकड सुरु केलीये. आत्तापर्यंत दीडशे कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आलाय.
दरम्यान, कोल्हापूर, सांगली आणि साताऱ्यातही पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आलाय. कर्नाटकी दडपशाहीविरोधात शिवसेनेनी दिलेल्या बंदच्या हाकेला नागरिकांनीही चांगलाच प्रतिसाद दिलाय. खबरदारीचा उपाय म्हणून कोल्हापूरातून बेळगावला जाणाऱ्या एसटीही बंद करण्यात आल्यात.