केबीसी घोटाळा : भाऊसाहेब चव्हाणचं मायाजाल उघड, चौथ्या लॉकरमध्येही सोने

केबीसी घोटाळ्यातला मुख्य आरोपी आणि ठगसेन भाऊसाहेब चव्हाणचं मायाजाल आता उघड होऊ लागलंय. भाऊसाहेब चव्हाणचं चौथं लॉकर खोलण्यात आलं. यात तब्बल दोन किलो ३५ ग्रॅम सोन सापडलं.

Updated: May 11, 2016, 11:39 PM IST
केबीसी घोटाळा : भाऊसाहेब चव्हाणचं मायाजाल उघड, चौथ्या लॉकरमध्येही सोने title=

नाशिक : केबीसी घोटाळ्यातला मुख्य आरोपी आणि ठगसेन भाऊसाहेब चव्हाणचं मायाजाल आता उघड होऊ लागलंय. भाऊसाहेब चव्हाणचं चौथं लॉकर खोलण्यात आलं. यात तब्बल दोन किलो ३५ ग्रॅम सोन सापडलं.

भाऊसाहेबच्या बँकेतल्या ठेवी आणि लॉकरची आर्थिक गुन्हे शाखेकडून कसून तपासणी सुरू आहे. यातून मंगळवारी सहा किलो ८०० ग्रॅम सोन जप्त करण्यात आलं होतं. या सा-या ऐवजाची बाजारभावानुसार किंमत सुमारे तीन कोटी रुपये एवढी आहे. 

केबीसीच्या माध्यमातून भाऊसाहेब चव्हाणनं ठिकठिकाणी माया जमवलीय. त्याचीच चौकशी आर्थिक गुन्हे शाखा करत आहे. याप्रकरणी आतापर्यंत १०९ कोटी रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय. भाऊसाहेबच्या नातेवाईकांच्या लॉ़कर्सचीही तपासणी करण्यात येणार आहे.