नागपूर : बहुचर्चित खैरलांजी हत्याकांडातले एकमेव साक्षीदार असलेले भैय्यालाल भोतमांगे यांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं निधन झालंय.
झटका आल्यानंतर त्यांना नागपूरच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
2006 मध्ये भंडारा जिल्ह्यातल्या खैरलांजीत भैय्यालाल भोतमांगे यांच्या पत्नीसह, मुलगी आणि दोन मुलांची हत्या करण्यात आली होती. या हत्याकांडाचे देशभरात तीव्र पडसाद उमटले होते.