नोटबंदीचा फटका कोकणातल्या पर्यटनाला

प्रत्येक विकेंडला कोकणातल्या पर्यटन ठिकाणी हमखास गर्दी पाहायला मिळतेच मात्र यावेळी परिस्थिती काहीशी वेगळी आहे. 

Updated: Dec 4, 2016, 06:28 PM IST
नोटबंदीचा फटका कोकणातल्या पर्यटनाला

रत्नागिरी : प्रत्येक विकेंडला कोकणातल्या पर्यटन ठिकाणी हमखास गर्दी पाहायला मिळतेच मात्र यावेळी परिस्थिती काहीशी वेगळी आहे. नोटबंदीनंतर दोन हजाराची नवीन नोट सुटी मिळत नसल्यामुळे पर्यटकांची गोची होताना दिसत आहे.कारण पैसे सुटे नसल्यामुळे खाण्यापिण्यावर तसंच खरेदीवर मर्यादा आल्या आहेत.

गि-हाईकाकडे पैसे सुटे नसल्यामुळे दुकानदारांची पंचाइत होतं आहे, त्यामुळे व्यवसायावर 70 टक्के परिणाम झाल्याचं दुकानदार सांगत आहेत. एकीकडे सुटे पैसे नसल्यामुळे पर्यटकांना त्रास होतोच आहे, पण हातावर पोट असणाऱ्या व्यावसायिकांचं पर्यटनस्थळी मोठं नुकसान होतं आहे.