कोल्हापूर : शहरातील खोलखंडोबा परिसरात एका माकडानं अनेक लोकांचा चावा घेऊन परिसरात दहशत निर्माण केली होती. अनेक तासांच्या अथक प्रयत्नानंतर या माकडाला पकडण्यात कोल्हापूर वनविभागाला यश आलं आहे.
आतापर्यंत या माकडानं जवळपास तीसहून अधिक लोकांवर हल्ला केला होता. कोल्हापूर शहराच्या पश्चीमेस असणा-या खोल खंडोबा परिसरात असणारं हे माकड अनेकांची डोके दुखी बनली होती. कोणी रस्त्यांवरुन जात असेल तरी हे माकडं थेट हल्ला चढवून अनेकांना जखमी करत होतं.
या माकडाला वनविभागानं पकडावं यासाठी नागरीकांनी अनेक दिवसापासून वनविभागाला पाठपुरावा केला, पण वनविभागाकडं प्रशिक्षीत व्यक्ती नसल्यामुळं अनेक अडचणी येत होती. पण आज सांगलीतून प्रशिक्षीत व्यक्तीला बोलावून वनविभागानं या माकडाला पिंज-यात जेरबंद करण्यात यश मिळविलं आहे. तीन तासाच्या प्रयत्नानंतर माकडाला पकडण्यात यश आले.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.