कोल्हापुरात बेदरकार एसटीने अनेकांना उडविले, दोन जागीच ठार

 कोल्हापुरात उमा टॉकिज परिसरात एसटीने अनेकांच्या अंगावर गाडी घालण्याचा धक्कादायक प्रकार घडला. या अपघातात दोन जण जागीच ठार तर अनेक वाहन चालक जखमी झाले. 

Updated: May 24, 2017, 07:25 PM IST
 कोल्हापुरात बेदरकार एसटीने अनेकांना उडविले, दोन जागीच ठार  title=

कोल्हापूर :  कोल्हापुरात उमा टॉकिज परिसरात एसटीने अनेकांच्या अंगावर गाडी घालण्याचा धक्कादायक प्रकार घडला. या अपघातात दोन जण जागीच ठार तर अनेक वाहन चालक जखमी झाले. 

ही गाडी रंकाळा हुपरी अशी जात असताना प्रकार घडला आहे.  या अपघातात अनेक दुचाकी वाहनांचा चक्काचूर झाला. 

नेमक काय झालं हे मला कळाले नाही, अशी प्रतिक्रिया हॉस्पिटलमध्ये दाखल झालेल्या चालकाने सांगितले आहे. दरम्यान, पुण्यात गेल्या काही वर्षांपूर्वी अशा प्रकारे बेदरकार गाडी चालवून संतोष माने या एसटी चालकाने अनेक गाड्यांना उडविले होते. 

असाच काहीसा प्रकार झाल्याची प्रथमदर्शनी माहिती मिळते आहे. सध्या उमा टॉकिजकडे जाणारे सर्व रस्ते बंद करण्यात आले असून नेमका हा प्रकार का घडला याचा तपास पोलीस करीत आहे.