नाशिक : कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमच्या नातेवाईकाचा लग्नसोहळा नुकताच नाशिकमध्ये पार पडला. या कार्यक्रमाला नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन, भाजपचे आमदार, महापौर यांच्यासह नाशिकमधले सर्वपक्षीय नेतेही उपस्थित होते. त्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.
तसेच देशभरातले बुकी आणि इतर गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेलेही या लग्नात सहभागी झाले होते अशी चर्चा आहे.
नाशिकमधले ८ पोलीस अधिकारी कर्मचा-यांनीही या लग्नाला हजेरी लावली होती. त्या संबंधीतांच्या चौकशीचे आदेश, नाशिक पोलीस आयुक्तांनी दिले आहेत.
दरम्यान, दाऊदच्या नातेवाईकांच्या या गोतावळ्याची कल्पना नाशिक पोलिसांना नव्हती, का असा सवाल आता केला जात आहे.