कोकण रेल्वेचे मुख्यालय गोव्याला हलविण्यास राणेंचा विरोध

कोकण रेल्वेचे मुख्यालय नवी मुंबईतील बेलापूर येथून थेट मडगाव, गोवा येथे हलविण्यात येण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. याला कोकणातील नागरिकांचा विरोध आहे. त्यातच काँग्रेसचे आमदार नितेश राणे यांनीही तीव्र आक्षेप घेत विरोध केलाय. याबाबत रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांना थेट पत्रच पाठविले आहे.

Updated: Apr 29, 2015, 03:12 PM IST
कोकण रेल्वेचे मुख्यालय गोव्याला हलविण्यास राणेंचा विरोध title=

मुंबई : कोकण रेल्वेचे मुख्यालय नवी मुंबईतील बेलापूर येथून थेट मडगाव, गोवा येथे हलविण्यात येण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. याला कोकणातील नागरिकांचा विरोध आहे. त्यातच काँग्रेसचे आमदार नितेश राणे यांनीही तीव्र आक्षेप घेत विरोध केलाय. याबाबत रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांना थेट पत्रच पाठविले आहे.

काँग्रेसचे कणकवली विधानसभा मतदार संघाचे आमदार नितेश राणे यांनी कोकण रेल्वेचं मुख्यालय महाराष्ट्रातून गोव्यात हलविण्याच्या हालचालींवर आक्षेप घेतला आहे. कोकण रेल्वेचं मुख्यालय महाराष्ट्राबाहेर हलवण्याचा निर्णय घेतल्यास प्रभूंनी महाराष्ट्रात येऊनच दाखवावे, असा इशारा राणे यांनी दिला आहे. याप्रकरणी त्यांनी प्रभू यांना पत्र लिहून आपली नाराजी स्पष्ट करताना आंदोलनाचाही इशारा दिला आहे.

सूडबुद्धीनं महाराष्ट्र महत्व कमी करण्याचा केंद्र सरकारचा यामागचा हेतू असल्याचा संशयही राणे यांनी व्यक्त केलाय. कोकण रेल्वे तीन राज्यांतून जाते. सर्वाधिक जागा ही महाराष्ट्रातील कोकण विभागातील गेली आहे. असे असताना मडगावला रेल्वेचे मुख्यालय कशासाठी, असं प्रश्न उपस्थित विचारण्यात येत आहे.

दरम्यान, कोकणचे महत्व कमी करण्यासाठी रेल्वेचे मुख्यालयत टप्प्याटप्प्याने हलविण्यात येत आहे. रत्नागिरी हे मध्यवर्ती ठिकाण असताना थेट मडगावला कोकण रेल्वेचे मुख्यालय कशाला, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू हे कोकणचे सुपुत्र आहेत. त्यांनी याप्रश्नी लक्ष घालावे, अशी मागणी होत आहे. तसेच डबल डेकर रेल्वे पुन्हा सुरु करण्यासाठी मागणीही होत आहे.

राणेंची मागणी पाहा

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.