बदला घेण्यासाठी चिमुरड्याचं अपहरण आणि हत्या

शहरातल्या गजबजलेल्या छाप्रू नगर परिसरातल्या एका उच्चभ्रू कुटुंबातल्या एका आठ वर्षीय मुलाचं अपहरण आणि हत्या घडवून आणल्याचं प्रकरण उघडकीस आलंय. त्यामुळे, परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालेलं दिसतंय. 

Updated: Sep 3, 2014, 10:53 AM IST
बदला घेण्यासाठी चिमुरड्याचं अपहरण आणि हत्या title=

नागपूर : शहरातल्या गजबजलेल्या छाप्रू नगर परिसरातल्या एका उच्चभ्रू कुटुंबातल्या एका आठ वर्षीय मुलाचं अपहरण आणि हत्या घडवून आणल्याचं प्रकरण उघडकीस आलंय. त्यामुळे, परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालेलं दिसतंय. 

युग चांडक या आठ वर्षीय मुलाचं अपहरण करून त्यानंतर त्याची हत्या केल्याचं उघड झालंय. शहरातले नामवंत दंत चिकित्सक डॉ. मुकेश चांडक यांचा युग हा मुलगा होता. 

जिल्ह्याच्या खापरखेडा परिसरात युगचा मृतदेह आढळून आलाय. अपहरण आणि खून प्रकरणी पोलिसांनी राजेश सारवे आणि अरविंद सिंह या दोन आरोपींना अटक केलीय. या दोन्ही आरोपींनी आपल्या कृत्याची कबुलीही दिलीय. 

कसा शिजला डाव... आणि का?
आरोपींपैकी राजेश सारवे डॉ. चांडक यांच्या क्लिनिकमध्ये आधी काम करत होता. कामा दरम्यान झालेल्या वादातूनच त्यानं बदला घ्यायचं ठरवलं. त्यातूनच दोन्ही आरोपींना युगला दुचाकीवर बसवलं आणि त्याला क्लोरोफॉर्म देत त्याला ठार मारलं. 

मात्र, ही हत्या केल्यानंतर पोलिसांची दिशाभूल करण्याकरता त्यांनी डॉ. चांडक यांच्या घरी फोन करत खंडणीसाठी धमकीही दिली होती. 

दरम्यान, या घटनेनंतर लकडगंज परिसरात तणावाचं वातावरण आहे. या घटनेमुळे संतप्त जमावानं पोलीस स्टेशनसमोर दगडफेक केलीय. मोठ्या संख्येनं जमाव लकडगंज पोलीस स्टेशनसमोर जमला होता. जमावानं रस्त्यावर टायरदेखील जाळले. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्यामुळे पोलिसांना सौम्य लाठीमारदेखील करावा लागला. परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याकरता अतिरिक्त कुमक बोलावली असून सध्या या भागात पोलिसांचा कडक बंदोबस्त आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.