मुंबई : प्रवाशांना चांगली सेवा उपलब्ध करण्याच्या उद्देशाने कोकण रेल्वेने कणकवली स्टेशनवर सरकते जिने बसविण्याचा निर्णय केला. तसेच प्रवाशी सुविधांमध्ये वाढ करण्यात येणार आहे.
रेल्वे मंत्री सुरेश प्रभू याबाबत घोषणा करण्याची शक्यता आहे. दि. ११ जानेवारी रोजी सांयकाळी ६.१५ वाजता कणकवलीतयेणार आहेत. त्यावेळी प्रवाशांच्या सुविधा आणि सरकते जिने या विषयी घोषणा करतील, अशी माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे कोकण रेल्वे मार्गावर प्रथमच सरकते जिने सुरु करण्यात येणार आहे.
प्रस्तावित सरकते जिने प्रवाशांना स्टेशनच्या प्रवेशापासून प्लॅट्फॉर्म क्र.१ वर जाण्यास सोयीचे ठरेल. त्यामुळे प्रवाशांना प्लॅट्फॉर्म क्र. १ वर जाण्यासाठी आपले सामान घेऊन जाण्याचा त्रास आता वाचणार आहे.
तसेच प्लॅट्फॉर्म क्र. १ ची रूंदी ६ मीटरपासून १२ मीटर करण्यात येणार आहे. तसेच स्टेशनवर अतिरिक्त लूप लाईन बनविण्यात येणार असल्यामुळे वाहतूक सुरळीत होईल मदत होणार आहे. तर स्टेशनवर नवीन तिकीट खिडकी उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याची माहिती कोकण रेल्वेने दिली आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.