कोकण रेल्वे मार्गावर गाडीच्या धडकेने १०० बकऱ्या ठार

कोकण रेल्वे मार्गावर रेल्वेने धडक दिल्यानं जवळपास १०० बकऱ्या ठार झाल्या. रायगड जिल्ह्यातील कोलाड जवळील गोवे गावाच्या हद्दीत हा अपघात झाला. 

Updated: Feb 23, 2016, 07:17 PM IST
कोकण रेल्वे मार्गावर गाडीच्या धडकेने १०० बकऱ्या ठार title=

अलिबाग : कोकण रेल्वे मार्गावर रेल्वेने धडक दिल्यानं जवळपास १०० बकऱ्या ठार झाल्या. रायगड जिल्ह्यातील कोलाड जवळील गोवे गावाच्या हद्दीत हा अपघात झाला. 

एकनाथ महानोर यांच्या मालकीच्या या बकऱ्या होत्या. पोलीस तसंच रेल्वे अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून मार्गावरून मृत बकऱ्या बाजूला करण्यात आल्यात. 

कोकण रेल्वे मार्गावर दोन्ही बाजूला संरक्षक जाळ्या अथवा कठडे नसल्यानं पाळीव जनावरं रेल्वे मार्गावर येऊन असे अपघात होत असतात. हे लक्षात घेऊन कठडे उभारावेत अशी मागणी सध्या होतेय.