कोयना अवजलावरून शिवसेनेतच दोन गट

कोयनेच्या अवजलावरून शिवसेनेतच दोन गट पडल्याचं समोर आलंय. वाया जाणारं कोयनेचं पाणी मुंबईला नेण्याच्या रवींद्र वायकरच्या भूमिकेला रामदास कदमांनी विरोध दर्शवलाय. तर केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गिते यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केलाय. 

Updated: Oct 21, 2015, 12:35 PM IST
कोयना अवजलावरून शिवसेनेतच दोन गट  title=

रत्नागिरी : कोयनेच्या अवजलावरून शिवसेनेतच दोन गट पडल्याचं समोर आलंय. वाया जाणारं कोयनेचं पाणी मुंबईला नेण्याच्या रवींद्र वायकरच्या भूमिकेला रामदास कदमांनी विरोध दर्शवलाय. तर केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गिते यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केलाय. 

वशिष्ठी नदी. चिपळूणची भाग्यलक्ष्मी. कोयना प्रकल्पातल्या वीज निर्मितीनंतर सोडल्या जाणाऱ्या ६७ टीएमसी अवजलावर वर्षानुवर्षे या नदीचं अस्तित्व टिकून आहे. पण आता कोयनेचं हे पाणी थेट मुंबईला नेण्याचा विचार रत्नागिरीचे पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी व्यक्त केलाय.

तर आधी कोकणची तहान भागवा मगच उरलेलं पाणी मुंबईला घेवून जा असं म्हणत रवींद्र वायकरांच्या भूमिकेला पर्यावरण मंत्री रामदास कदमांनी विरोध दर्शवलाय. पाणी हा वादाचा विषय होऊ नये असं म्हणत केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गिते यांनी वायकर आणि कदमांचे कान टोचलेत.

आघाडी सरकारच्या काळात कोयनेच्या वाया जाणाऱ्या पाण्याचा योग्य वापर करण्याच्या दृष्टीनं एक सर्व्हे करण्यात आला होता. पण योजनेचा अफाट खर्च पाहता त्यावेळी हा विषय मागे पडला. पण आता नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून हे पाणी मुंबईला हलवण्याच्या हालचाली दिल्लीवरून सुरू झाल्याचं बोललं जातंय. पण या निमित्तानं शिवसेनेतच मतभिन्नता समोर आलेय. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.