अहमदनगर : अहमदनगरच्या कोपर्डी येथे घडलेल्या घटनेनंतर सर्वच स्तरातून निषेध व्यक्त केला जातोय.
कोपर्डी प्रकरणातील आरोपींना आज कोर्टात आणल्यावर काही महिलांनी चप्पलफेक करत निषेध व्यक्त केलाय. आरोपींना कोर्टाच्या आवारात आणल्यावर स्मिता आष्टेकर या महिलेनं चप्पल फेकून मारली.
दरम्यान, ही चप्पल एका महिला पोलिस कर्मचा-याला लागल्याची माहिती मिळतेय. यात पोलीस कर्मचारी कल्पना केदारी जखमी झाल्याचीही माहिती आहे.
कोपर्डी बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपींना 30 जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आलीये.