पुणे : पुणे - मुंबई एक्सप्रेस हाईवेवर खंडाळा बोगद्या समोर ज्याठिकाणी दगड हटविण्याचे काम सुरु आहे. तेथेच पहाटे ३ ते सव्वा तिनच्या सुमारास परत काही दगड मार्गावर आले. यामुळे येथील काम पूर्ण होण्यास आणखी काही वेळ लागण्याची शक्यता आहे.
या दरडग्रस्त परिसरामध्ये एक किलोमिटर अंतरात वाहतूक या पूर्वीच पूर्णपणे बंद करण्यात आली असल्याने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. पर्याय म्हणून या मार्गावरील हलक्या वाहनांची वाहतूक लोणावळा येथून जुन्या महामार्गानं वळविण्यात आली आहे.
खंडाऴयाच्या दस्तुरी येथे ती पुन्हा एक्स्प्रेस हायवेला जोडली आहे. तर मुंबईहून पुण्याकडे येणाऱ्या मार्गावरील दोन लेन पुण्याकडे जाणाऱ्या वाहनांसाठी खुल्या ठेऊन एक लेन मुंबईकडे जाणाऱ्या अवजड तसेच इतर वाहनांसाठी खुली करण्यात आली आहे. मात्र वाहनांची संख्या अचानक वाढल्याने लोणावल्यातील एक्सप्रेस हाइवेवरील वाहतूक संथ आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.