भाजपचा 'लॅपटॉप मॅन' डोईजड!

पिंपरी चिंचवडमध्ये सध्या भारतीय जनता पक्षात प्रचंड धुसफूस आहे. या नाराजीचं कारण ठरलाय पक्षात काही दिवसांपूर्वी दाखल झालेला लॅपटॉप मॅन... 

Updated: May 14, 2015, 03:15 PM IST
भाजपचा 'लॅपटॉप मॅन' डोईजड! title=

पुणे : पिंपरी चिंचवडमध्ये सध्या भारतीय जनता पक्षात प्रचंड धुसफूस आहे. या नाराजीचं कारण ठरलाय पक्षात काही दिवसांपूर्वी दाखल झालेला लॅपटॉप मॅन... 

पिंपरी चिंचवडमध्ये सध्या भाजप म्हणजेच आमदार लक्ष्मण जगताप अशी स्थिती आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये आल्यानंतर लक्ष्मण जगताप यांनी पद्धतशीरपणे पक्ष ताब्यात घेतला. मुख्यमंत्र्यांपासून अनेक मंत्र्यांना थेट घरी आणत त्यांनी हा संदेशही दिला. भाजप कार्यकर्तेही नाईलाजाने जगताप यांचं नेतृत्व मान्य करायला लागले. 

पण आता जगताप यांच्यासोबत भाजप मध्ये आलेल्या आणि 'लॅपटॉप मॅन' म्हणून प्रसिद्ध असलेल्या सारंग कामतेकर यांच्यामुळे नाराजीला सुरूवात झालीय. शिवसेनेतून हकालपट्टी झाल्यावर कामतेकर जगताप यांच्यासह भाजपमध्ये दाखल झाले. सध्या पक्षाची बहुतांश ध्येय धोरणं, जगताप यांचे निर्णय भाजप कार्यकर्त्यांना पत्रकारांना पोहोचवण्याचं काम कामतेकर करतात. मात्र पक्षसंघटना बाजूला राहिली, कामतेकरच संपूर्ण यंत्रणा चालवतात, अशी ओरड पक्षातून सुरू झालीय. शहराध्यक्षांकडेही तशा तक्रारी आल्या आहेत. दुसरीकडे कामतेकर यावर काहीही बोलायला तयार नाहीत. 

प्रत्येक नेत्याचा एक विश्वासू सहकारी असतो. जगताप यांचा सहकारी सारंग कामतेकर आहे. पण कामतेकर पक्ष हायजॅक करत असल्याची पक्षात ओरड सुरू झालीय. त्यामुळे सध्या पिंपरी चिंचवडमध्ये भाजपमध्ये गृहकलह जोरदार पेटलाय. 
 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.