अलिबाग : प्रेमीयुगुलाचा जबरदस्तीनं बालविवाह लावल्याप्रकरणी अलिबाग तालुक्यातल्या आंदोशी गावातल्या नऊ गावपंचांना हायकोर्टानं एक महिना कैदेची शिक्षा सुनावलीय.
यापैंकी सात जणांनी कोर्टासमोर समर्पण केलं असून त्यांची अलिबाग जेलमध्ये रवानगी करण्यात आलीय.
आंदोशी गावातली एक अल्पवयीन मुलगी आणि मुलाचे प्रेमसंबंध होते. १९९४ साली गावपंचांनी त्यांचं जबरदस्तीनं लग्न लावून दिलं. मुलीच्या आईच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
अलिबाग न्यायालयानं गावपंचांना नऊ वर्षांची शिक्षा सुनावली होती. त्याविरोधात गावपंचांनी हायकोर्टात धाव घेतली.
त्यावर निर्णय देताना हायकोर्टानं नऊ गावपंचांची शिक्षा कमी करत केवळ एक महिना कैदेची शिक्षा सुनावलीय.
१९९४ साली झालेल्या या प्रकारात तब्बल २१ वर्षांनी आरोपींना शिक्षा झालीय तीही केवळ एका महिन्याची...
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.