खेड येथे बिबट्याचा विहीरीत पडून मृत्यू

खेड तालुक्यातील लोटे या ठिकाणी एका बिबट्याचा विहीरीत पडून मृत्यू झाला.

Updated: Jan 7, 2015, 05:18 PM IST
खेड येथे बिबट्याचा विहीरीत पडून मृत्यू title=

रत्नागिरी : खेड तालुक्यातील लोटे या ठिकाणी एका बिबट्याचा विहीरीत पडून मृत्यू झाला.

भक्षाच्या मागे असताना हा बिबट्या लोटेमधील भेंडीची वाडी याठिकाणी असलेल्या सार्वजनिक विहीरीत पडला. सकाळी पाणी आणण्यासाठी गेलेल्या महिलांना विहीरीत मृतावस्थेत पडलेला बिबट्या दिसला.

रात्री विहीरीत पडलेल्या बिबट्याला बाहेर येण्यासाठी कोणताही मार्ग नसल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला असल्याचा अंदाज वनविभागाकडून व्यक्त केला जातोय.

विहीरीत पडून बिबट्यांचा मृत्यू होण्याच्या घटना रत्नागिरीत वारंवार घडताहेत. उपासमारीमुळे बिबट्यांचा मृत्यू होण्याचं प्रमाण सध्या कोकणात वाढतय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.