सोलापूर : सहकारमंत्री सुभाष देशमुख यांची लोकमंगल मल्टीस्टेट सोसायटीच्या अडचणीत वाढ झाली आहे.
लोकमंगलच्या व्यवहारात अनियमितता झाल्याचं सुभाष देशमुख यांनी मान्य केलंय. अनियमिततेचे शासन भोगायला तयार आहे, असंही सुभाष देशमुखांनी म्हटलंय.
या नोटा व्यवहारात येतील अशी आशा होती, म्हणून रक्कम बँकेत ठेवली. मात्र ही रक्कम बेहिशेबी किंवा निवडणुकीची नाही असंही सुभाष देशमुखांनी स्पष्ट केलंय.
उस्मानाबाद जिल्ह्यातल्या उमरग्यात सापडलेल्या ९१ लाख ५० हजारांच्या रोकड का ठेवली. खुलासा करण्याचे आदेश निवडणूक आयोगानं मागवलंय.
नोटाबंदीनंतर आठ दिवस उलटले तरी ९१ लाखांच्या पाचशे आणि हजाराच्या नोटा लोकमंगल मल्टीस्टेटनं का ठेवून घेतल्या होत्या? असा प्रश्न निवडणूक आयोगानं विचारलाय.
पाच नोव्हेंबरला सोलापूरच्या मुख्य शाखेतून लोहारा आणि उमरगा शाखेला देण्यात आल्याचा खुलासा लोकमंगल मल्टीस्टेटनं दिला होता.
दरम्यान, याप्रकरणी दिल्लीतल्या रजिस्टार दिल्ली यांच्याकडून मागवणार असल्याचं निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सांगितलंय.