महाड पूल दुर्घटना : आतापर्यंत २१ मृतदेह हाती, मृतांची ओळख पटली

महाड येथे झालेल्या पूल दुर्घटनेत आतापर्यंत २१ जणांचे मृतदेह हाती लागले आहेत. त्यापैकी गुरुवारी संध्याकाळपर्यंत सापडलेल्या २१ मृतदेहांची ओळख पटली आहे.

Updated: Aug 5, 2016, 06:14 PM IST
महाड पूल दुर्घटना : आतापर्यंत २१ मृतदेह हाती, मृतांची ओळख पटली title=

मुंबई : महाड येथे झालेल्या पूल दुर्घटनेत आतापर्यंत २१ जणांचे मृतदेह हाती लागले आहेत. त्यापैकी गुरुवारी संध्याकाळपर्यंत सापडलेल्या २१ मृतदेहांची ओळख पटली आहे.

 

महाड अपघातात एकूण ४२ बेपत्ता असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले. एसटीतील प्रवाशांच्या नातेवाईकांना १० लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. तर अन्य प्रवाशांना ५ लाखांची मदत मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली आहे.

मृतांची नावे

१. प्रभाकर शिर्के - संगमेश्वर ( राजापूर-बोरीवली बस वाहक)
२. सुनील बैकर (जयगड-मुंबई बसचे प्रवाशी)
३. रमेश कदम  (कोळकेवाडी, चिपळूण) राजापूर-बोरीवली बसचे प्रवासी
४. प्रशांत माने
५. स्नेहल बैकर
६. आवेश आल्ताफ चौगुले, चिपळूण (राजापूर-बोरीवली बसचे प्रवासी)
७. पांडुरंग घाग
८. शेवंती मिरगल (हरिहरेश्वर येथे)
९. संपदा संतोष वाजे (केंभुर्ली येथे)
१०. चालक श्रीकांत एस. कांबळे (जयगड-मुंबई एसटी) 
११. मंगेश काटकर, विरार - आंबेत  
१२. अनिस बलेकर (खंडाळा - रत्नागिरी) - आंबेत  
१३. जयेश बने (बोरीवली - मुंबई) - म्हाप्रळ 
१४. बाळकृष्ण उरक (नानर-राजापूर) - केंबुर्ली 
१५. अजय सीताराम गुरव (४०, ओणी, राजापूर) राजापूर-बोरिवली एसटी - केंबुर्ली
१६. विजय विश्राम पंडित (४८, सोनगिरी, संगमेश्वर) राजापूर-बोरिवली एसटी - केंबुर्ली
१७. विनिता विजय पंडित (४०, सोनगिरी, संगमेश्वर) राजापूर-बोरिवली एसटी - केंबुर्ली
१८. संतोष सोनू गावडे (३६, नालासोपारा) राजापूर-बोरिवली एसटी - केंबुर्ली
१९. भूमी भूषण पाटेकर (२७, वैभववाडी, सिंधुदुर्ग) जयगड- मुंबई एसटी - केंबुर्ली
२०. भिकाजी रामचंद्र वाघधरे (७४, जोगेश्वरी) राजापूर-बोरिवली एसटी - वावे
२१. सुरेश देवू सावंत (६१, निवळी,बावनदी, रत्नागिरी) जयगड- मुंबई एसटी - दादली