सोशल मीडियावर महाडच्या सापडलेल्या एसटीचे सत्य

 महाड येथे झालेल्या भीषण दुर्घटनेत सावित्री नदीवरील पूल कोसळून दोन एसटी आणि सहा वाहने वाहून गेल्यानंतर आता बचाव पथकाला २० मृतदेह हाती लागले आहेत. पण सोशल मीडियावर महाडच्या सरकारी हॉस्पीटलमागे एसटी बस सापडल्याचे खोटे वृत्त आणि दोन फोटो व्हायरल होत आहे. 

Updated: Aug 5, 2016, 03:49 PM IST
सोशल मीडियावर महाडच्या सापडलेल्या एसटीचे सत्य  title=

महाड :  महाड येथे झालेल्या भीषण दुर्घटनेत सावित्री नदीवरील पूल कोसळून दोन एसटी आणि सहा वाहने वाहून गेल्यानंतर आता बचाव पथकाला २० मृतदेह हाती लागले आहेत. पण सोशल मीडियावर महाडच्या सरकारी हॉस्पीटलमागे एसटी बस सापडल्याचे खोटे वृत्त आणि दोन फोटो व्हायरल होत आहे. 

एक जबाबदार मीडिया म्हणून आम्ही या व्हॉट्सअॅपवर फिरणाऱ्या दोन फोटोंची खातरजमा केली, त्यावेळी असे लक्षात आले की हे दोन फोटो २०१५ ला झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातातील आहे. 

यातील पहिला फोटो हा भीमाशंकर पुणे बसचा आहे. या बसला अपघात २० फेब्रुवारी २०१५ रोजी झाला होता. यात ११ प्रवासी जखमी झाले होते पण सुदैवाने प्राण हानी झाली नाही. 

तर दुसरा फोटो हा जेजुरी येथे झालेल्या  अपघाताचा आहे. ही बस भिवंडीहून गाणगापूरला जात होती. बसचं टायर फुटल्याने हा अपघात झाला होता. यात २० ते २५ प्रवासी जखमी झाले होते. 

सूचना :

कृपया आपल्या असे मेसेज येत असतील तर ते फॉरवर्ड करू नका. या अपघातात बेपत्ता झालेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांपर्यंत असे फोटो जातात आणि ते विनाकारण धावपळ करतात. त्यामुळे तुम्ही जबाबदारी घ्या. आम्ही सत्य दाखवलं आहे. फॉरवर्ड केले असल्यास ही बातमी सत्य सांगणारीही शेअर करा..