महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

महाराष्ट्र... नावातच राष्ट्राची, राज्याची महानता दिसून येते... ज्ञानोबांच्या ओवीपासून तुकोबांच्या अभंगांमध्ये तल्लीन होणारा महाराष्ट्र..

Updated: May 1, 2013, 08:13 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
महाराष्ट्र... नावातच राष्ट्राची, राज्याची महानता दिसून येते... ज्ञानोबांच्या ओवीपासून तुकोबांच्या अभंगांमध्ये तल्लीन होणारा महाराष्ट्र... संत नामदेव, चोखामेळा यांची संत परंपरेच्या भक्तीचा महाराष्ट्र... शिर्डीचे साईबाबा-शेगावचे गजानन महाराज या दैवी माणसांची देवभूमी असलेला महाराष्ट्र...
ताठ मानेनं जगायला शिकवलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र... धर्मवीर संभाजी राजेंच्या पराक्रमानं दिल्लीलाही घाम फुटतो असा महाराष्ट्र... संत गाडगे महाराजांपासून ते महात्मा ज्योतिबा फुले, विनोबा भावे, बाबा आमटेंसारख्या समाजसुधारकांनी समाजासाठी जीवन वाहिले असा महाराष्ट्र...

फुले-शाहू-डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा महाराष्ट्र... सह्याद्रीच्या कड्या कपारीपासून इतिहासाची साक्ष देणा-या गड-किल्ल्यांचा महाराष्ट्र... आचार्य अत्रे, पु.ल.देशपांडे, लतादीदी-सचिन तेंडुलकर- अमिताभ बच्चन अशा दिग्गजांचा महाराष्ट्र.. मात्र या सगळ्यांत महाराष्ट्रासाठी रक्त सांडणा-या 106 हुतात्म्यांना विसरुन कसं चालेल..
आपल्या प्राणाची आहुती देऊन त्यांनी महाराष्ट्र एकसंध ठेवला... या सर्व हुतात्म्यांना आणि महाराष्ट्रासाठी आयुष्य वेचलेल्या प्रत्येकाला अभिवादन करुन सर्व प्रेक्षकांना महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा....