अकोला : तामिळनाडूमधील चेन्नईच्या पुरात अडकलेले अकोल्याच्या सेन्टअॅन्स शाळेचे ४६ विद्यार्थी आणि शिक्षक आज सुखरुप परतले.
हैद्राबादहून खासगी ट्रॅव्हल्सनं सकाळी १० वाजता ते अकोल्यात दाखल झाले. त्यांचं शाळेत जल्लोषात स्वागत करण्यात आलं.
२५ नोव्हेंबरला शाळेची सहल केरळ इथं गेली होती. या विद्यार्थ्यांसोबत खामगावच्या सेंटअॅन्स शाळेचे ३० विद्यार्थी आणि ५ शिक्षकही होते.
हे सर्वजण ३ डिसेंबरला अकोल्यात पोहोचणार होतेय. मात्र ते पुरात अडकून पडले होते. अखेर हे सर्वजण सुखरूप परतल्यानं शाळेचे विद्यार्थी आणि पालकांनी सुटकेचा निश्वास टाकलाय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.