परमार आत्महत्या प्रकरण : विक्रांत चव्हाण, नजीब मुल्लाला १४ दिवसांची कोठडी

बांधकाम व्यावसायिक सूरज परमार यांच्या आत्महत्येप्रकरणी शरण आलेले ठाणे महानगरपालिकेतील नगरसेवक नजीब मुल्ला, विक्रांत चव्हाण यांना १४ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी ठोठविण्यात आली आहे. 

Updated: Dec 5, 2015, 08:52 PM IST
परमार आत्महत्या प्रकरण : विक्रांत चव्हाण, नजीब मुल्लाला १४ दिवसांची कोठडी   title=

ठाणे : बांधकाम व्यावसायिक सूरज परमार यांच्या आत्महत्येप्रकरणी शरण आलेले ठाणे महानगरपालिकेतील नगरसेवक नजीब मुल्ला, विक्रांत चव्हाण यांना १४ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी ठोठविण्यात आली आहे. 

मुल्ला आणि चव्हाण या दोघांना शनिवारी संध्याकळी सुनावणीसाठी सत्र न्यायालयात हजर करण्यात आले होते. तर दुसरीकडे आरोपी नगरसेवकांपैकी सुधाकर चव्हाण, हनमंत जगदाळे यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी केईएम रूग्णालयात पाठविण्यात आले.

परमार आत्महत्याप्रकणी गुन्हा नोंदविण्यात आलेले सुधाकर चव्हाण, विक्रांत चव्हाण, हनमंत जगदाळे, नजीब मुल्ला हे चारही नगरसेवक शनिवारी सकाळी पोलिसांना शरण आले. चारही नगरसेवकांना अटकेपासून अंतरिम दिलासा देण्यास उच्च न्यायालयाने मंगळवारी स्पष्ट नकार दिला होता. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.