माळीण : माळीण दुर्घटनेतील मृतांची शोध मोहिम थांबवण्यात आली आहे. मातीच्या ढिगाऱ्याखालून आतापर्यंत 151 मृतदेह काढल्याचं सांगण्यात आलं. ढिगाऱ्या उसण्याचं काम मागील आठ दिवसांपासून सुरू होतं.
ही दुर्घटना 30 जूलै रोजी घडली होती, माळीण गावावर डोंगर कोसळल्याने 151 जणांचा मृत्यू झाला, तर आठ जणांना जिवंत बाहेर काढण्यात यश आलंय. या दरडीच्या ढिगाऱ्याखाली गावातली जवळपास 44 घरं दबली गेली होती.
एनडीआरएफनं काल एकुण 151 मृतदेह काढल्याची माहिती दिली. आठ दिवसांनंतर कुणाचीही जिवंत बाहेर निघण्याची शक्यता मावळली आहे. त्यामुळं 8 जिवंत आणि 151 मृतदेह बाहेर काढल्यानंतर एनडीआरएफनं आज सायंकाळी ढिगारा उपसण्याचं काम बंद करण्याचा निर्णय जाहीर केला.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.