रत्नागिरी : पुण्यातील पिंपरी- चिंचवड येथून रत्नागिरीला येणाऱ्या एसटीला साखपाजवळील मालपवाडी येथे अपघात झाला. हा अपघात सकाळी ५.४५ वाजता झाला. एसटी थेट दरीत कोसळून शेतात कोसळली. या अपघातात २० प्रवासी जखमी झालेत. त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले.
पिंपरी- चिंचवडहून रत्नागिरीकडे एसटी येथे होती. साखपाजवळील मालपवाडी येथे एका अवघड वळणावर हा अपघात झाला. एसटी थेट दरीतून शेतात घुसली. या एसटीतून ३१ प्रवासी प्रवास करत होते. त्यापैकी या अपघातात २० प्रवासी जखमी झाले आहेत. तर ३ प्रवासी गंभीर जखमी आहेत. जखमींवर रत्नागिरीच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
या अपघात बस चालक संदीप सुतार, वाहक अल्ताफ पठाण, राजकुमार पाटील, अमितेश सुर्वे, विष्णू पांचाळ, अशोक जोयशी, महमंद अन्सारी, राजकुमार धपाटे, स्वप्नील जाधव, सूर्यकांत जाधव, रेणुका लांजेकर, चंद्रकांत मणचेकर, सुरेश दुधवडकर, सुनंदा दुधवडकर, शैलेश गुरव, आरती धोत्रे, सागर नारकर, दिव्या नारकर, सल्वाद्दीन कुरेशी, कालीम कुरेशी आदी जखमी झाले आहेत.
एसटीचे अधिकारी तात्काळ घटनास्थळी पोहोचले नसल्याचं सांगण्यात येत आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.