पिंपरीचा लखोबा लोखंडे फसवायचा विधवा महिलांना...

लग्नाच्या संकेतस्थळावर खोटं प्रोफाइल बनवून महिलांना फसवणाऱ्या मुंबईतल्या एका भामट्याला पिंपरी चिंचवड च्या भोसरी पोलिसांनी अटक केलीय. या भामट्याने अनेक महिलांना फसवल्याचं समोर आलंय

Updated: Nov 25, 2016, 08:39 PM IST
पिंपरीचा लखोबा लोखंडे फसवायचा विधवा महिलांना... title=

कैलास पुरी, झी मिडिया पिंपरी चिंचवड : लग्नाच्या संकेतस्थळावर खोटं प्रोफाइल बनवून महिलांना फसवणाऱ्या मुंबईतल्या एका भामट्याला पिंपरी चिंचवड च्या भोसरी पोलिसांनी अटक केलीय. या भामट्याने अनेक महिलांना फसवल्याचं समोर आलंय

फिरोज अहमद नियाज शेख असे या भामट्याचे नाव असून या भामट्याचा पराक्रम ऐकाल तर तुम्ही थक्क व्हाल..! हा भामटा शादी डॉट कॉम या संकेतस्थळावर लग्नासाठी प्रोफाइल टाकायचा. खासकरून विधवा महिलांना तो लग्नासाठी मागणी घालायचा... 

पिंपरी चिंचवडच्या दापोडी मधल्या एक महिलेला त्याने असच लग्नासाठी तयार केलं आणि भेटीसाठी मुंबईला बोलवले. स्टॅम्प पेपर वर सह्या करून महिलेचा विश्वास संपादन केला. परत पुण्यात आल्यावर महिला फ्रेश होण्यासाठी गेली असता त्याने महिलेची पर्स, सोन्याच्या दोन चैन, अंगठी, कर्णफुले, सॅमसंग नोट ५ मोबाईल आणि २१ हजार रुपये रोख असा ऐवज लंपास केला. पोलिसांनी त्याला अटक केल्यानंतर त्याच्याकडून तब्ब्ल १४ मोबाईल जप्त केलेत..

फिरोज अहमद नियाज शेखने  मुंबई सह विविध भागातल्या १० महिलांना फसवल्याचे समोर आलंय.  

भोसरी पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे. या भामट्याला तर पोलिसांनी पकडलंय, पण असे अनेक भामटे अजून बाहेर आहेत, त्यामुळं कोणाला एकटे भेटायला जात असाल तर महिलांनो सावधान तो ४२० असू शकतो...!