सोलापूर : दारुचं व्यसन सर्वस्ववाचा नाश करतं. सोलापूरमध्ये त्याचंच प्रत्यक्ष उदाहरण पाहायला मिळालं.
सोलापुरातल्या इंदिरा नगर भागात भाड्याच्या पत्र्याच्या घरात, प्रकाश मामड्याल आपली पत्नी आणि दोन मुलांसह राहत होता. प्रकाश हा पूर्णपणे दारुच्या आहारी गेला होता.
दारुच्या नशेत शुक्रवारी प्रकाश घरी आला. तिथे त्याचं नेहमीप्रमाणे पत्नीशी वाद झाला. त्यानंतर पत्नी पाणी भरण्यासाठी बाहेर गेली होती. त्यावेळात प्रकाशनं स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतलं. यावेळी त्यानं आपल्यासोबत जवळच झोपलेल्या चार आणि दोन वर्षांच्या आपल्या मुलांनाही कवटाळलं.
या घटनेत प्रकाश आणि त्याच्या दोन चिमुरड्यांचा होरपळून मृत्यू झालाय.