पुण्यानंतर आता पिंपरी-चिंचवडमध्येही 'माणुसकीची भिंत'

पुण्यानंतर आता पिंपरी चिंचवडमध्ये माणुसकीची भिंत उभारण्यात आली आहे.

Updated: Nov 27, 2016, 06:35 PM IST
पुण्यानंतर आता पिंपरी-चिंचवडमध्येही 'माणुसकीची भिंत'  title=

पिंपरी चिंचवड : पुण्यानंतर आता पिंपरी चिंचवडमध्ये माणुसकीची भिंत उभारण्यात आली आहे. लहानपणीच्या सवंगड्यानी व्हाट्सअप ग्रुपवरून एकत्रित येत या भिंतींद्वारे सामाजिक बांधिलकी जपली आहे.

तुम्हाला "नको असेल तर द्या आणि हवे असेल तर घेऊन जा" असा नारा देत सुरु झालेल्या या उपक्रमाला मोठा प्रतिसाद मिळताना दिसत आहे. अनेक जण घरातील जुने कपडे या माणुसकीच्या भिंतीवर आणून ठेवत आहेत. तर ज्यांना या कपड्यांची गरज आहे ते यातून हवे ते घेऊन जात आहेत. त्यामुळेच या स्तुत्य उपक्रमाचं सर्व स्थरातून कौतुक होताना दिसतं आहे.