रायगडवरून प्रवास करण्याचा बेत असेल तर... सावधान!

रविवारी म्हणजेच उद्या कोकणाकडे जाणार असाल तर तुम्हाला थोड्या त्रासाचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. कारण मराठा क्रांती मूक मोर्चाचं रविवारी रायगडमध्ये आयोजन करण्यात आलंय. 

Updated: Oct 22, 2016, 04:37 PM IST
रायगडवरून प्रवास करण्याचा बेत असेल तर... सावधान! title=

रायगड : रविवारी म्हणजेच उद्या कोकणाकडे जाणार असाल तर तुम्हाला थोड्या त्रासाचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. कारण मराठा क्रांती मूक मोर्चाचं रविवारी रायगडमध्ये आयोजन करण्यात आलंय. 

हा मोर्चा निजामपूर रोड ते मुंबई गोवा महामार्गावरून माणगाव तहसिल कार्यालयाकडे जाणार आहे. त्यामुळं मोर्चाची गर्दी लक्षात घेता सकाळी ८ ते संध्याकाळी ६ या वेळेत लोणेरे ते पोटनेर दरम्यान अवजड वाहनांना बंदी घालण्यात आलीय.

माणगाव तालुक्याच्या हद्दीतली किरकोळ वाहतूक निजामपूर-बोरवाडी फाटा-हरवंडी-कडापूर-ताम्हाणे-जांभूळपाडा ते ढालघर फाटा अशी वळवण्यात आलीय.

मात्र, यातून अत्यावश्यक सेवा, रुग्णवाहिका आणि अग्निशमन दल तसचं अतिमहत्त्वाच्या व्य्क्तींची वाहनं वगळण्यात आलीय.