पुणे : राज्यात अनेक ठिकाणी मराठा मोर्चांना मोठा प्रतिसाद मिळत असतानाच आज पुणे आणि यवतमाळमध्ये मराठा क्रांती मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय.
मराठा क्रांती मोर्चांच्या नियोजनासाठी पुण्यात वॉर रूम उभारण्यात आली आहे. या वॉर रूम मधून राज्यभरातील मराठा क्रांती मोर्चांचे नियोजन करण्यात येत आहे. महिनाभरापासून वॉर रूम सुरु आहे.
चारशे स्वयंसेवक या वॉर रूम मध्ये कार्यरत आहेत. स्वतंत्र आयटी सेलही कार्यरत आहे. तर या वॉर रूम मध्ये महिला आणि युवतींचाही मोठा सहभाग आहे. मोर्चांचं काटेकोर नियोजन वॉर रूम मधून केलं जातय. पुण्यातील मोर्चासाठी सात हजार स्वयंसेवक आहेत. पार्किंगसाठी ८० ग्राऊंड आहेत.