मुंबई : एक हिल स्टेशन म्हणून माथेरान प्रसिद्ध आहेच. पण इथली डोंगरद-यांमधून धावणारी माथेरान लाईट रेल्वेही तेवढीच प्रसिद्ध आहे. याच माथेरानच्या राणीचं एक शंभर वर्ष जुनं इंजिन इंग्लंडमध्ये विक्रीला काढण्यात येतयं. माथेरान रेल्वे सुरु करणा-या पीरभॉय कुटुंबियांनी आता हा ऐतिहासिक वारसा परत मिळविण्यासाठी प्रयत्न सुरु केलेत.
माथेरान...म्हणजे मुंबईजवळचं हिरवगार हिल स्टेशन. या हिलस्टेशनप्रमाणेच इथली माथेरान लाईट रेल्वेही प्रसिद्ध आहे. आता एक बातमी याच रेल्वेची. डोंगराच्या कुशीतून धावणा-या या रेल्वेचं शंभर वर्ष जुनं एक इंजिन इंग्लडच्या एका वस्तुसंग्रहालयात पडून होतं. या वस्तुसंग्रहालयानं आता हा वारसा विकायला काढलाय.
इंजिन खरेदी करणाराने ते चालू स्थितीत ठेवावे अशी अट संग्रहालयाने घातली आहे. माथेरान रेल्वे सुरु करणा-या सर आदमजी पीरभॉय यांच्या कुटुंबियांनी आता हे इंजिन पुन्हा भारतात आणण्यासाठी प्रयत्न सुरु केलेत. रेल्वे मंत्रालय आणि भारत सरकार यांनी हे इंजिन परत आणण्यासाटी प्रयत्न करावेत अशीही पीरभॉय कुटुंबियांची इच्छा आहे.
१९०७ ते १९६५ या काळात हे इंजिन माथेरान लाईट रेल्वेच्या सेवेत होते. त्यानंतर काही काळ नेरळ येथेच हे इंजिन होतं. औरिएनश्टाईन अँण्ड कॉप्पेल या जर्मन कंपनीकडून चार इंजिनं सर आदमजी पीरभॉय यांनी खरेदी केली होती त्यातलचं हे इंजिन आहे.
हे इंजिन 1986 मध्ये इंग्लंडमधील अम्बर्ले चॉक पीट्स या वस्तुसंग्रहालयाला भारतीय रेल्वेनं भेट म्हणून दिलं. या वस्तुसंग्रहालयाने पीटसबर्ग येथील रेडवर्ल्ड वस्तुसंग्रहालयाला हे इंजिन 1991 मध्ये दान केलं त्यांनी आता विकायला काढलयं. ते भारतात परत आणावं, अशी पीरभॉय कुटुंबियांची इच्छा आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.