कोल्हापूर : कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणी मेधा पानसरे यांनी संजीव पुनाळेकरांविरोधात तक्रार दाखल केलीय. संजीव पुनाळेकर सनातन संस्थेचे कायदेशीर सल्लागार आहेत.
पानसरे हत्या प्रकरणात एक अल्पवयीन मुलगा साक्षीदार आहे. 'त्या साक्षीदाराला सांभाळा' असं विधान पुनाळेकरांनी काही दिवसांपूर्वी केलं होतं. या प्रकरणी मेधा पानसरे यांनी पुनाळेकरांविरोधात कोल्हापुरातल्या शाहुपुरी पोलिसांना पत्र लिहिलंय.
तसंच, साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांना पुनाळेकरांनी 'मॉर्निंग वॉकला जात चला' असा धमकीवजा सल्ला ट्विटरवरून दिला होता. त्यामुळेही मोठा वाद निर्माण झाला होता. हा धमकीवजा सल्ला गोविंद पानसरे आणि नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरणाशी लावला जातोय.