पुणे : बाबा रामदेव यांनी नुकतीच येरवडा जेलमध्ये जाऊन कैद्यांची भेट घेतली... साहजिकच यावेळी त्यांची भेट १९९३ च्या बॉम्बस्फोट प्रकरणात दोषी ठरलेल्या अभिनेता संजय दत्त याच्याशीही झाली.
योगाचं महत्त्व समजावून सांगण्यासाठी योगगुरु बाबा रामदेव येरवड्यात दाखल झाले होते. इथं त्यांनी जवळपास दोन तास अनेक आसन करून दाखवले. शिवाय, शारीरिक आणि मानसिकरित्या कसं स्वस्थ राहावं, याबद्दलही बाबा रामदेवांनी सांगितलं.
यावेळी, बाबा रामदेव यांनी कैद्यांकडे आपल्याला दक्षिणा म्हणून 'धुम्रपान' द्यावं, असं सांगत त्यांच्याकडे धुम्रपानाची सवय सोडण्याची विनंती केली.
बाबा रामदेवांच्या या योगा कॅम्पमध्ये कैद्यांसहीत जेलमधले अनेक अधिकारीही सहभागी झाले होते.