'मी बेळगावचा बेळगाव महाराष्ट्राचे'... कोल्हापूरच्या तरुणावर कारवाई

'मी बेळगावचा बेळगाव महाराष्ट्राचे' अशी अक्षरं लिहिलेला टी शर्ट विकत असल्याच्या कारणावरून बेळगावच्या खडे बाजार पोलिसांनी ताब्यात घेतलं. 

Updated: Feb 11, 2017, 01:15 PM IST
 'मी बेळगावचा बेळगाव महाराष्ट्राचे'... कोल्हापूरच्या तरुणावर कारवाई  title=

बेळगाव : 'मी बेळगावचा बेळगाव महाराष्ट्राचे' अशी अक्षरं लिहिलेला टी शर्ट विकत असल्याच्या कारणावरून बेळगावच्या खडे बाजार पोलिसांनी ताब्यात घेतलं. 

१६ फेब्रुवारी रोजी बेळगावमध्ये मराठा समाजाचा मोर्चा निघणार आहे. या क्रांती मोर्चासाठी टी शर्ट आणि टोप्या बनवण्यात आल्या होत्या. त्यावर 'मी बेळगावचा बेळगाव महाराष्ट्राचे' असं लिहिलेलं होतं. त्यावरून पोलिसांनी हे टी शर्ट विकणाऱ्या 25 वर्षीय शहाजी भोसले याला ताब्यात घेतलं. 

शहाजी भोसले याच्यावर भादंवी कलमान्वये गुन्हा १५३ अनुसार, 'जात, भाषा, धर्म, पोट जाती किंवा इतर मुद्द्यांवरून तेढ निर्माण करण्याचा' गुन्हा दाखल करण्यात आलाय. दोन भाषिक गटात तेढ निर्माण करण्याचा आरोप त्याच्यावर नोंदविण्यात आलाय. 

मोर्चाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरचा रहिवासी असलेल्या शहाजीवर कारवाई झाल्यानं युवा वर्गातही संताप पसरला आहे. यानंतर कोल्हापूर जिल्ह्यात कर्नाटक प्रशासनावर संताप व्यक्त केला जातोय.